naga shaurya- रिअल लाईफ हिरो | पुढारी

naga shaurya- रिअल लाईफ हिरो

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार हे फक्त रिल लाईफ हिरो नाहीत तर रिअल लाईफ हिरोही आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे. तेलुगू अभिनेता नाग शौर्य याने भर रस्त्यात अशी कामगिरी केली, त्याला चाहते रिअल लाईफ हिरो म्हणत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला भर रस्त्यात मारहाण करत असताना नाग शौर्यने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओत गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीशी नाग शौर्य रागाने बोलताना दिसत आहे. तो व्यक्ती तिथून जाऊ लागला तेव्हा नाग शौर्यने त्याचा हात धरून थांबवले आणि मारहाण थांबवण्यास सांगितले. तू तिला रस्त्यावर का मारलेस? ती तुझी गर्लफ्रेंड असू शकते, पण त्यामुळे तू तिच्यासोबत वाटेल तसा वागू शकत नाही. तिची माफी माग, असे तो रागाने त्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही घटना भर रस्त्यात घडत होती आणि आजूबाजूने गाड्या धावत होत्या. भांडणारी ही दोघे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचे समजल्यावर त्याने त्या तरुणाला तिची माफी मागण्यास सांगितले.

Back to top button