आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप नगरसेविका, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप नगरसेविका, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

सिडको; पुढारी वृत्तसेवा : बलात्कारातील आरोपीला अटकेच्या मागणीसाठी अंबड पोलिस ठाणे येथे ठिय्या आंदोलन केल्या प्रकरणी आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेविका व पदाधिकारी यांच्या वर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बाबत पोलिसांनी माहिती दिली की, बलात्कारातील गुन्ह्यासंदर्भात आरोपीचा अंबड पोलीस स्टेशनकडून तपास सुरु असताना भारतीय जनता पक्षाच्यावतीने पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका छाया देवांग, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेविका हर्षा फिरोदिया, नगरसेविका अलका अहिरे, नगरसेविका कावेरी घुगे, नगरसेवेक मुकेश शहाणे, जगन पाटील, भाजपा सिडको अध्यक्ष अविनाश पाटील, शिवाजी बरके, राकेश ढोमसे, डॉ. वैभव महाले, अॅड. अतुल सानप, राहुल गणोरे, किरण गाडे, पिंटु काळे, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील व इतर १० ते १५ पुरूष व महिला कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन ठिय्या आंदोलन केले. यामुळे अंबड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी वरील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

वरील कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी (दि.२८) ६ वाजता वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस ठाणेत येऊन आरोपीला तात्काळ अटक करा, आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधुन जाणार नाही, असे म्हणून ठिय्या आंदोलन केले होते. सरकारविरोधी घोषणा देऊन, पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.

त्यामुळे सदर गंभीर गुन्हयाचा तपास पोलीस करत असताना गुन्हा तपासाच्या वेगाला बाधा येईल असे कृत्य केले. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून आमदार सीमा हिरे, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द् अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा तपास अंबड पोलीस करीत आहेत.

Back to top button