नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत | पुढारी

नाशिक : त्वरा करा... ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2023-24 च्या प्रवेशासाठीच्या निवड चाचणीसाठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोदय विद्यालय समितीतर्फे प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. येत्या 29 एप्रिलला निवड चाचणी परीक्षा होणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वांगीण शिक्षणासाठी अग्रेसर असणार्‍या नवोदय विद्यालय समितीने इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. या विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी त्या जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी अनुदानित अथवा मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता पाचवीत शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये शिक्षण घेत असावा. तसेच या विद्यार्थ्याने इयत्ता तिसरी, चौथीचे शिक्षण सरकारी – निमसरकारी अनुदानित अथवा मान्यताप्राप्त शाळेत घेतलेले असावे. विद्यार्थ्यास ज्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याच जिल्ह्यातील शाळेत पाचवीचे शिक्षण घेतलेले असावे. तसेच संबंधित विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 दरम्यान झालेला असणे बंधनकारक आहे. या विद्यालयातील किमान 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असतील. तसेच 1/3 जागा मुलींकरिता राखीव असेल.

हेही वाचा :

Back to top button