नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई | पुढारी

नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
दुकानाचे नामफलक मराठीऐवजी इंग्रजीतून लावणार्‍या तीन दुकानदारांविरुद्ध सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे फौजदारी कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्यांमध्ये सिंधी कॉलनीतील एम टू एम हब, आर. जी. कलेक्शन आणि यशराज ऑटो पार्ट्स या तीन दुकानांचा समावेश आहे. राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतून असावेत, असा निर्णय राज्य शासनाने जानेवारी 2022 मध्ये घेत जिल्हा प्रशासनाकडून संबंधित दुकानांना आदेश देण्यात आले होते. जिल्ह्यात मार्च 2022 मध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात 31 दुकाने आस्थापनांची तपासणी करण्यात आली होती. त्यांना याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मराठीतून नामफलक करण्याबाबत दुर्लक्ष केल्याने या तीन दुकानांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना 2017 नुसार दुकाने निरीक्षक जितेंद्र पवार यांनी फौजदारी कारवाई केली आहे. दुकानमालकांनी नामफलक, पाटी मराठी भाषेतून करून घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button