Virat Kohli Fight : विराट कोहली भडकला; बांगलादेशी खेळाडूला भिडला, शकिब-उल-हसनने केला हस्तक्षेप (Video) | पुढारी

Virat Kohli Fight : विराट कोहली भडकला; बांगलादेशी खेळाडूला भिडला, शकिब-उल-हसनने केला हस्तक्षेप (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Fight : भारत आणि बांगलादेश यांच्यातील मिरपूर, बांगलादेशमध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना आता रोमांचक वळणावर पोहोचला आहे. बांगलादेशने भारताला विजयासाठी 145 धावांचं लक्ष्य दिलं होतं, मात्र टीम इंडियाचा दुसरा डाव गडगडला. तिस-या दिवसाअखेर 50 धावापूर्वी चार विकेट पडल्या. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 100 धावांचा पल्ला गाठायचा होता आणि त्यांच्या हातात फक्त 6 विकेट शिल्लक होत्या.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी विराट कोहलीची विकेट पडली तेव्हा मैदानावर जोरदार वाद झाला. बाद झाल्यानंतर विराट बांगलादेशी खेळाडूशी भिडला. हे प्रकरण वाढणार असे वाटत असतानाच बांगला देशचा कर्णधार शकिब अल हसनने मध्यस्थी करत विराटला सावरले. (Virat Kohli Fight)

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहली केवळ 1 धावा करून बाद झाला. मेहदी हसन मिराजने त्याची शिकार केली. मोमिनुल हसनने विराटचा झेल टिपला. भारताची सर्वात मोठी विकेट घेतल्यानंतर बांगलादेशी खेळाडूंनी जल्लोष केला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडू आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला. विराट भडकला आणि क्रीजवर थांबला. दरम्यान बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन विराटच्या जवळ आला आणि त्याच्याशी काहीतरी बोलला. त्यानंतर प्रकरण निवळले. (Virat Kohli Fight)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट झाली. बांगलादेशने भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात टीम इंडियाने 45 धावांवर 4 विकेट गमावल्या आहेत. टीम इंडियाचे सर्व मोठे फलंदाज तंबूत परतले.

दुसऱ्या डावात भारताच्या विकेट्स-

• केएल राहुल (2 धावा) : 3-1
• चेतेश्वर पुजारा (6 धावा) : 12-2
• शुभमन गिल (7 धावा) : 29-3
• विराट कोहली (1 धाव) – 37-4

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 314 धावा केल्या होत्या. टीम इंडियाला थोडी आघाडी मिळाली, पण बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा केल्या आणि टीम इंडियाने त्यांना ऑलआउट केले. यानंतर भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले.

Back to top button