Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली | पुढारी

Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली

सुरगाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

जमीनीच्या सातबारावर इतरांची नावे कशी आली आणि त्यात माझे नाव का नाही असा जाब विचारत एक जणाने येथील नायब तहसिलदार यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्याने संबधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नायब तहसिलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील हट्टी येथील भारत गुलाब पवार ही व्यक्ती अन्य दोन जणांसोबत तहसिल कार्यालयात मंगळवारी दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास आली होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निवडणूक शाखेत बसून शासकीय कामकाज करीत असताना यावेळी भारत गुलाब पवार याने सोबत आणलेला हट्टी गाव शिवारातील गट नंबर ५० चा उतार दाखविला. या उताऱ्यावर माझे नाव का कमी केले. तसेच उताऱ्यात इतर लोकांची नावे कशी आली. अशी विचारणा केली.

उताऱ्यात तुझ्या वडिलांचे नाव असून त्यांच्या पश्चात तुझे नाव लागेल. त्यासाठी लेखी अर्ज कर असे सांगितले. त्यावेळी भारत यास राग येऊन त्याने मोरे यांना शिविगाळ करत कॉलर पकडून गालात थापड मारून शर्टाची बटने तोडली. सर्वांना बघून घेण्याची दमबाजी केली. असे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.  हा प्रकार घडल्यानंतर भारत पवार व अन्य दोघे तहसिल आवारातील तिरंगा ध्वजाखाली काही काळ ठाण मांडून बसले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून निघून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button