नेवाशात पाच गावांचे सरपंच बिनविरोध ; आठ सरपंचपदांसाठी 22 उमेदवार रिंगणात | पुढारी

नेवाशात पाच गावांचे सरपंच बिनविरोध ; आठ सरपंचपदांसाठी 22 उमेदवार रिंगणात

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीपैकी चिंचबन ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाली. उर्वरित 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 197 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाच गावांचे सरपंच बिनविरोध झाले असून, 8 गावांच्या सरपंच पदासाठी 22 जण रिंगणात आहेत.

चिंचबनचे बिनविरोध उमेदवार असे ः सरपंच – मीना गोरक्षनाथ काकडे, सदस्य ताराबाई मापारी, दत्तात्रय राजपूत, शारदा चव्हाण, सविता शिंदे, सुनिता चव्हाण, कमलाबाई जाधव, कमल बर्डे.

सुरेशनगर सरपंच शैला कल्याण उभेदळ, खुपटी – दत्तात्रय सूर्यभान वरूडे, शिरेगाव -निरंजन द्वारकानाथ तुवर, हिंगोणी-रूपाली ज्ञानेश्वर खंडागळे.

निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार असे : हंडीनिमगाव सदस्यापदासाठी 20 व सरपंचपदासाठी 2, सुरेशनगर सदस्यपदासाठी 4, खुपटी सदस्यपदासाठी 2, गोधेगाव सदस्यपदासाठी 4 व सरपंचपदासाठी 3, भेंडा खुर्द सदस्यपदासाठी 18 व सरपंचपदासाठी 3, माका सदस्यपदासाठी 36 व सरपंचपदासाठी 5,अंमळनेर सदस्यपदासाठी 18व सरपंचपदासाठी 2, शिरेगाव सदस्यपदासाठी 19, वडाळा बहिरोबा सदस्यपदासाठी 27 व 2,माळीचिंचोरा सदस्यपदासाठी 39 व सरपंचपदासाठी 3, हिंगोणी सदस्यपदासाठी 8,कांगोणी सदस्यपदासाठी 22 व सरपंचपदासाठी 2 असे एकूण 197 सदस्यपदांसाठी व 8गावच्या सरपंचपदासाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भेंडा खुर्द, माका, शिरेगाव, वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरा व कांगोणी येथील स्थानिक पातळीवर लढती होण्याची चिन्हे आहेत.
4 ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाली असली तरी सदस्य पदाच्या निवडणुका मात्र अटीतटीच्या होणार आहेत. माळीचिंचोरा वडाळा बहिरोबा व माका येथील लढती लक्षवेधक ठरणार आहे.

 

Back to top button