Nashik : आमदार रोहित पवार करणार गायत्रीची बहीण पूजाच्या शिक्षणाचा खर्च | पुढारी

Nashik : आमदार रोहित पवार करणार गायत्रीची बहीण पूजाच्या शिक्षणाचा खर्च

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

सीमा सुरक्षा दलात रुजू झालेली आणि नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला सैनिक ठरलेल्या गायत्री विठ्ठल जाधवच्या निधनानंतर देवगाव येथील तिच्या निवासस्थानी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज तिच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांंचे सांत्वन केले. गायत्रीची बहीण पूजाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत सीईटीच्या क्लासची नाशिकला सोय करून दिली.

अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत गायत्री २०२१ मध्ये स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. राजस्थानातील अलवर येथे खडतर प्रशिक्षण सुरू असताना खड्ड्यात पडून तिचा अपघात झाला. तिच्या मेंदूवर जयपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. तिला पुढील उपचारासाठी एम्स दिल्लीला नेण्यात येणारे होते. मात्र, तिथे जाण्यापूर्वी तिची तब्येत खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत माहिती कळताच आ. रोहित पवार यांनी गायत्रीच्या घरी सांत्वनपर भेट दिली. यावेळी आ. पवार यांनी सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत त्यांना मृत गायत्रीच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. यावेळी गायत्रीचे मामा गणेश कोकणे व आई-वडिलांनी गायत्रीच्या आजारपणादरम्यान आलेल्या सर्व अडीअडचणीची माहिती दिली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे गायत्री जाधव यांच्या घरी माजी उपमुख्यमंत्री व आ. छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, माजी जि. प. सदस्य अमृता पवार, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. श्रीकांत आवारे, प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, उपसरपंच लहानू मेमाणे, विंचूर सरपंच सचिन दरेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button