नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात | पुढारी

नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरगाणा या आदिवासी भागात कारवाई राबवली. यामध्ये पंचायत समितीचे बचत गट कर्ज वितरण विभागातील दोन समन्वयकांसह एक इसमास १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

स्वयंरोजगार उभारणीकरिता तालुक्यातील बचतगटांना गट निधी, कर्ज वितरण, पतपुरवठा करणेकामी बुधवारी (दि. २) दीडच्या सुमारास पंचायत समितीच्या संबंधित विभागातील कर्मचारी तालुका अभियान व्यवस्थापक कंत्राटी कामगार प्रमोद बाळासाहेब पाटोळे (३७, रा. बोरगाव), विलास मोतीराम खटके (३८) प्रभाग समन्वयक हट्टी, यादव, खासगी इसम मोतीराम गांगुर्डे (३०, रा. चिंचपाडा) यांना रंगेहाथ पकडले. नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार उमेद अभियान अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कामाचे मानधन देण्याकामी १० हजारांची मागणी केली. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. एसीबीने सापळा रचून पवार एका चहाच्या टपरीवर तिघांनी १० हजारांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप सांळुखे, पोलिस हवालदार नितीन कराड, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, संतोष गांगुर्डे, विवेक देवरे यांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

हेही वाचा:

Back to top button