पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे चीनचे रॉकेट, कुठेही कोसळू शकते? | पुढारी

पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे चीनचे रॉकेट, कुठेही कोसळू शकते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेंगटियन मॉड्यूलला (Mengtian module) अवकाशात घेऊन जाणारे चीनचे रॉकेट पृथ्वीवर परत येत आहे. परंतु ते नेमके कुठे कोसळणार ही जागा निश्चित नसल्याने भिती व्यक्त केली जात आहे. ते कोठेही पडण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. २३ टन वजनाचे असणारे हे रॉकेट नागरी वस्तीत पडल्यास मोठी हानी होऊ शकते.

चायनीज अवकाश संशोधन संस्था (CSMA) ने त्यांच्या तिआंगॉन्ग (Tiangong) या अवकाश स्थानकासाठी लाँग मार्च 5B रॉकेटने (Long March 5B rocket) मेंगटियन मॉड्यूलला अवकाशात पाठवले होते. रॉकेटचे काम झाल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत येत असून त्याची पडण्याची जागा निश्चित नसल्याचे चायनीज अवकाश संस्थेने सांगितले आहे. मोड्यूल्सना किंवा उपग्रहांना अवकाशात पोहचवल्यानंतर अशी रॉकेट्स पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात आणि त्यांच्या वेगामुळे आणि हवेच्या घर्षणामुळे भूपृष्ठावर पोहचण्याअगोदर ती नष्ट जातात. पण चीनचे हे रॉकेट वातावरणात येऊनही संपूर्ण नष्ट झाले नसल्याने ते धोकादायक होऊ शकते.

तिआंगॉन्ग अवकाश स्थानक हा चीनचा एक अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प असून नासाच्या (NASA) पुढाकाराने उभारलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकानंतर चीनचे हे स्थानक दुसरे असणार आहे. अवकाश संशोधनामध्ये चीन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी अनके प्रयोग करत आहे. चिनी अवकाश संस्थेवर अवकाशात अधिक प्रमाणात कचरा (Space Junk) निर्माण करत असल्याचा आरोप जगभरातून होत असतानाच आता नवीन एक रॉकेट धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?

 

Back to top button