कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून जामनेरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी | पुढारी

कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून जामनेरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

ढगफुटीमुळे जामनेर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते याच वादळी पावसात घरावरील पत्रे उडून बैल जखमी झाला होता. या बैलाला पशुवैद्यकांनी 30 टाके घालून त्याचे प्राण वाचविले.  त्याला पाहणी कृषीमंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्याच्या घरी झाले त्याला आश्वासन दिले की बैलाच्या उपचारावर होणारा खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले.

ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी  दिल्यात.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतक-र्यांशी संवाद साधला.

जामनेर तालुक्यातील काही गावात चार दिवसापूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ओझर येथे घरावरील पत्रा उडून बैलावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला होता. मंत्री भुसे व आमदार किशोर पाटील यांनी आज  बैल मालक शेतकरी रमेश भगवान माळी यांचे घर गाठले. तेथे त्यांनी या बैलाच्या प्रकृतीची माहिती शेतकरी श्री. माळी यांच्याकडून घेतली.

तसेच या बैलाच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगत शेतकरी माळी यांना दिलासा दिला.

यावेळी मंत्री दादा भुसे यांनी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी ए बी चोपडे यांना नुकसानीचे पंचनामे, तातडीची मदत व पिक विम्याबाबत सुचनाही दिल्या.

हेही वाचले का? 

Back to top button