डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयात दारुड्या वॉर्ड बॉयचा धिंगाणा | पुढारी

डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयात दारुड्या वॉर्ड बॉयचा धिंगाणा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वॉडबॉय रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ करत असल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. वॉर्डबॉयने रुग्णालयातील इमर्जनसी वॉडमध्ये ही शिवीगाळ केली.

यावेळी डॉक्टरांनी मध्यस्थी करत वातावरण चिघळणार नाही याची काळजी घेतली. एकप्रकारे डॉक्टरांनी वॉडबॉयला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर वॉडबॉय दारू पिऊन इमर्जन्सी वॉडमध्ये झोपला असताना त्याला उठवल्याने त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला आहे.

रिपब्लिकन सेनेचे कल्याण – डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आनंद नवसागरे हे शुक्रवारी वडिलांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयाच्या तळमजल्यावर ईमर्जन्सी वॉडमध्ये नवसागरे गेले असता तिथे बेडवर एक वॉडबॉय झोपल्याचे पाहिले. वडिलांवर लवकर उपचार सुरू होणे आवश्यक असल्याने त्यांनी झोपलेल्या वॉड बॉयला उठवले. रुग्णाची सेवा करण्याऐवजी हा वॉडबॉय दारू पिऊन झोपा काढत असल्याने नवसागरे यांनी त्याला जाब विचारला.

परंतु माफी मागण्याऐवजी वॉडने नवसागरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तर बाजूकडील एका खोलीत नर्स देखील आराम करत असल्याचे नवसागरे यांनी पाहिले. वॉडबॉय नवसागरे यांच्याशी मोठ्या आवाजात वाद घालत असल्याचे ऐकून डॉक्टर इमर्जन्सी वॉडमध्ये धावते आले. दारुच्या नशेत तराट असलेल्या वॉडबॉयने नवसागरे यांना शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार नवसागरे यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. रुग्णालयात दारू पिऊन धिंगाणा घालणारा वॉडबॉय कोविड काळात तात्पुत्या सेवेसाठी पालिका प्रशासनाने कामावर रुजू केला होता. मात्र मस्ती चढलेल्या या वॉडबॉयने ड्युटीवर असताना दारू पिऊन रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ केल्याने या वॉड बॉयला तात्काळ सेवेतुन काढून टाकण्यात यावे अशी मागणी नवसागरे यांनी केली आहे.

दरम्यान हा वॉडबॉयने कोविड काळात गरीब रुग्णांच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांची आर्थिक लूट केली तसेच डेडबॉडी बांधण्यासाठी हजार ते दोन हजार रुपये उळल्याचा आरोप होत आहे.

Back to top button