स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या संदर्भात आढावा बैठक घेत कामाचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.21) महापालिकेची विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. एकूणच पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडवर गेल्याने शिंदे गट आता शहरासह जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नाशिक शहरातील गावठाणात क्लस्टर योजना राबविणे, झोपडपट्टी पुनर्विकास, सिडकोतील घरे फ्री होल्ड करणे अशा महत्त्वाच्या विषयांवर महापालिकेतील बैठकीत चर्चा होणार आहे. पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भुसे यांनी महापालिका व जिल्हा परिषदेवर लक्ष केंद्रित केले आहे. मनपात याआधी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांबाबत दुसरी बैठक मुंबईमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, नासाका कारखान्याच्या गाळप हंगामाचे उद्घाटन असल्यामुळे भुसे यांनी नाशिकला बैठक घेण्याचे ठरवले आहे.

या विकासकामांवर होणार चर्चा….
नाशिकरोड थेट जलवाहिनीसाठी 250 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे. पावणेदोन लाख रहिवाशांना एसआरएअंतर्गत पक्की घरे देणे.पूररेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करणे. सिडकोतील 28 हजार सदनिका फ्री होल्ड करणे. गावठाणातील घरांसाठी क्लस्टर डेव्हलपेंट योजना राबविणे. खड्डेमुक्तीसाठी काँक्रिटीकरण. नोकरभरतीचा आकृतिबंध मंजूर करणे. 200 खाटांची नवीन रुग्णालय आदी.

हेही वाचा:

Back to top button