Google ला भारतीय स्पर्धा आयोगाने ठोठावला १३३७ कोटींचा दंड | पुढारी

Google ला भारतीय स्पर्धा आयोगाने ठोठावला १३३७ कोटींचा दंड

पुढारी ऑनलाईन : भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) अमेरिकन कंपनी गुगलवर १३३७ रूपये कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस क्षेत्रात कंपनीच्‍या मजबूत स्‍थितीचा गैरवापर करून, स्‍पर्धेत व्यत्यय आणल्‍याबद्दल कंपनीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी आपल्या आदेशात, आयोगाने Google ला अनुचित व्यावसायिक कृती थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच काम करण्याच्या पद्धतीतही बदल करण्यास सांगितले आहे.

मोबाईलवर अॅप चालविण्यासाठी ऑपरेटींग सिस्टम (OS) आवश्यक असते. ही सिस्टम Google Android OS चालवते आणि त्याचे व्यवस्थापनही करते. आणि इतर प्रयोग करण्यासाठी परवानगीही देते. ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) हे OS आणि Google चे अॅप त्यांच्या मोबाईलमध्ये वापरतात. त्यांचे अधिकार नियंत्रित करण्यासाठी ते मोबाईल अॅप्लिकेशन वितरण करार (MADA) सह अनेक करार करतात. पण गुगलने मार्केटमधील त्यांचे मजबूत स्थान आणि प्रभावाचा वापर करत या कंपन्यांच्या करारांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे गुगलवर भारतीय स्पर्धा आयोगाने ही कारवाई केली असल्याचे म्हटले आहे.

यावेळी कंपनीने म्हटले आहे की, गुगलने मार्केटमधील आपले मजबूत स्थान आणि प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्यासोबत केलेल्या अनेक करारांचे उल्लंघन केले आहे. अमेरिकेच्या या कंपनीने ऑनलाईन सामान्य सर्च मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी Android OS अॅप स्टोअर मार्केटमध्ये असलेल्या आपल्या प्रभावाचा फायदा घेतला आहे. तसेच हे स्पर्धा कायद्याचे उल्लंघन असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

Back to top button