धुळे: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यावर शाईफेक प्रकरण | पुढारी

धुळे: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यावर शाईफेक प्रकरण

धुळे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याच्या अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१५) गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीच्या विशेष सभेत भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना मदत होण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या अनिता पाटील आणि शालिनी भदाणे या दोघी तटस्थ राहिल्या. या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गटाने संतप्त भावना व्यक्त केली.

ही सभा संपल्यानंतर तटस्थ राहणाऱ्या दोन्ही महिला सदस्य कारने घरी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी शिवसेने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील तसेच महिला आघाडीच्या हेमा हेमाडे यांनी कार अडवून महिला सदस्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावर शाई फेक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका करण्यात आल्या.

मात्र, या प्रकरणी आज धुळे शहर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी भदाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील आणि महिला आघाडीच्या हेमा हेमाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button