नाशिक : एनडीएसटी’च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत | पुढारी

नाशिक : एनडीएसटी'च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या व शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे लक्ष लागलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी निवडणुकीस आज शनिवारी (दि. १५ ) रोजी सकाळी ८ वाजता नाशिक शहर व जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.

एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत आहे. नाशिक जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीत २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनलची निर्मिती झाली असून, या निवडणुकीत प्रगती पॅनल, दुसरे परिवर्तन पॅनल व तिसरे पॅनल पीडीएफ/ डीसीपीएस पॅनल आहे.

नाशकात त्रिंबक नाका येथे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय येथे मतदान केंद्र आहे. या केंद्रा बरोबरच जिल्ह्यातील तालुका ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर मतदान सुरु झाले आहे. मतदान केंद्राच्या बाहेर प्रवेशद्वारवर उमेदवार व पॅनल नेते मतदाराला मतदानासाठी आवाहन करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button