कोल्हापूर : नरंदे ओढ्यातून दानोळीचे पाचजण गेले वाहून; तीनजण बचावले, दोन बेपत्ता | पुढारी

कोल्हापूर : नरंदे ओढ्यातून दानोळीचे पाचजण गेले वाहून; तीनजण बचावले, दोन बेपत्ता

दानोळी, पुढारी वृत्तसेवा : मौजे नरंदे (ता. हातकणंगले) येथे सायंकाळी ७ वाजता गिड्डे मळा येथे मजुरीसाठी गेलेल्या मजूर महिला वाहून गेल्याची घटना घडली. यातील तीन जण बजावले असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.

दानोळी येथील तीन पुरुष व दोन महिला नरंदे येथील गिड्डे मळा येथे शेत मजुरीसाठी गेले होते. दरम्यान या परिसरात अचानक ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने ओढ्याला अचानक पाणी वाढले. गावाकडे येण्याच्या गडबडीत हे सर्वजण ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेले.

रमेश अण्णासाहेब सांगले, सदाशिव ज्ञानू थोरात, दादासो गुरुलिंग क्षिरसागर व लक्ष्मीबाई कोळी हे झाडाच्या फांद्यांना धरून बचावले. पण आनंदी गणेश राजमाने (वय- ४०) यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्या वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच दानोळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शोध मोहीम सुरू आहे. पण पाऊस व अंधार यामुळे शोध कार्यात अडचनी येत आहेत. आनंदी यांच्या पतीचे काही वर्षा पूर्वी निधन झाले आहे व दोन मुलींचे लग्न झाले आहे. त्या बेघर वसाहत परिसरात एकट्याच राहतात.

हेही वाचलंत का?

Back to top button