नाशिक : वणीत तरुणाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : वणीत तरुणाची आत्महत्या

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

येथील बसस्थानक परिसरात जितेंद्र हिरामण घोडे (27) या तरुणाने झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या केली. वणी पोलिस ठाण्यात सायंकाळी चारला याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह खाली उतरवून वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप उलगडलेले नाही.

हेही वाचा:

Back to top button