गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगाल आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा, नेमकं काय घडलं? | पुढारी

गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगाल आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : पोर्तुगालच्या एका रूग्णालयात बेड न मिळाल्याने दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना वाटेत हृदयविकाराचा झटका आल्याने गर्भवती भारतीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरातील सोशल मीडियावर खळबळ उडाली. यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी सदर महिलेच्या मृत्यूपूर्वी पाच तास आधीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला असून, देशाची आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी जनतेला दिले आहे.

स्थानिक वृत्तानुसार पोर्तुगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपत्कालीन प्रसूती सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रूग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा आहे तसेच आरोग्याच्या योग्य सेवा सुविधा मिळत नाहीत. यामुळे देशाची आरोग्यव्यवस्था आणि आरोग्यमंत्र्यांवर वारंवार टीका होत आहे. याच परिस्थितीत येथे बेड न मिळाल्याने दुसऱ्या रूग्णालायत नेत असताना वाटेत एका गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्यमंत्री मार्टा यांनी राजीनामा दिला आहे.

आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी पंतप्रधांनाकडे राजीनामा दिल्यानंतर तो त्यांनी स्वीकारला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांचे कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. मार्टा २०१८ पासून पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री होत्या. देशातील करोना स्थिती योग्यरितीने हाताळण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं.

काय आहे घटना?

संबंधित गर्भवती महिला पोर्तुगालमध्ये फिरण्यासाठी आली होती. यानंतर ती प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल होण्यासाठी आली असता, तिला रूग्णालयात प्रसूती कक्षात तिला बेड उपलब्ध नसल्याने तिला दुसऱ्या रूग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. या महिलेला दुसऱ्या रूग्णालयात नेले जात असतानाच तिचा वाटेत, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्याच्या वेगासारखी पसरली. यानंतर नेटकरऱ्यांनी पोर्तुगाल सरकारवर जोरदार टीका केली.

हेही वाचा:

 

Back to top button