नाशिक : तिसगावला विहिरीत पडून एकाचा मृत्यू  | पुढारी

नाशिक : तिसगावला विहिरीत पडून एकाचा मृत्यू 

चांदवड: पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील तिसगाव येथील केशव वंसत गांगुर्डे (४९) हे विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. यावेळी त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेबाबत संपत निवृत्ती गांगुर्डे (वय ४३) यांनी खबर दिल्याने चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हवालदार वाय के शेवाळे करीत आहे.

हेही वाचा:

Back to top button