पिंपळे गुरव : एम. एस. काटे चौकात धोकादायक खड्डा | पुढारी

पिंपळे गुरव : एम. एस. काटे चौकात धोकादायक खड्डा

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : येथील एम. एस. काटे चौक ते माहेश्वरी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यात गेल्या दोन महिन्यांपासून पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बर्‍याच दिवसांपासून एम. एस. काटे चौकात ड्रेनेज वाहिनीच्या कामाकरिता पाईप रस्त्यावर पडून आहेत. रस्त्यात खड्डा खोदून ठेवला आहे.

महापालिकेने सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेट लावले असले तरी याचा वाहतुकीस अडथळा होत आहे. दापोडी, पिंपळे गुरवकडून सांगवीकडे जाणार्‍या या रस्त्यावर दररोज वाहनांची वर्दळ असते. दापोडी, पिंपळे गुरव आणि सांगवीकडे जाणार्‍या मध्यवर्ती रस्त्यावर सकाळ आणि संध्याकाळ वाहतूककोंडी पाहायला मिळते. त्यातच रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी परिसरातील सर्व अर्धवट विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

Back to top button