NCRB Data : दिल्लीतील सायबर गुन्ह्यांमध्ये तब्‍बल 111 टक्क्यांनी वाढ, लैंगिक शोषणाच्‍या सर्वाधिक तक्रारी | पुढारी

NCRB Data : दिल्लीतील सायबर गुन्ह्यांमध्ये तब्‍बल 111 टक्क्यांनी वाढ, लैंगिक शोषणाच्‍या सर्वाधिक तक्रारी

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा : सरत्या वर्षात देशाची राजधानी दिल्लीतील सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल १११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात ‘एनसीआरबी’कडून ( NCRB Data ) ही माहिती देण्यात आली आहे. सायबर क्राईमच्या गुन्ह्यांवर नजर टाकली तर लैंगिक शोषणांचे सर्वाधिक सायबर गुन्हे करण्यात आल्याचे दिसून येते.

NCRB Data : विशेष विभागाची स्थापनेनंतरही गुन्‍ह्यात वाढ

ऑनलाईन फ्रॉड, ऑनलाईन उत्पीडन तसेच बदनामी करणारी माहिती वेबवर टाकण्याचे प्रमाण गेल्या काही काळात वाढलेले आहे. सायबर गुन्हे रोखणे आणि त्याला आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष विभागाची स्थापना केलेली असूनही अशा गुन्ह्यांत वाढ झालेली आहे. 2021 साली दिल्लीत 356 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. तत्पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांतील वाढ 111 टक्क्यांनी जास्त आहे.

लैंगिक शोषणाच्या तक्रारी सर्वाधिक असून, अशा तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींत वाढ झाली असल्याचे दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले. केवळ लोकांनी दिलेल्या तक्रारींवर हा विभाग काम करीत आहे, असे नाही तर सोशल मीडीयाच्या बाबतीत येणाऱ्या तक्रारींवरही काम केले जात असल्याचे मल्होत्रा यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

 

Back to top button