नाशिक : दगडफेक प्रकरणी 25 संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे | पुढारी

नाशिक : दगडफेक प्रकरणी 25 संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे

नाशिक : प्राणघातक हल्ला केल्याची कुरापत काढून झालेल्या वादात दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना रविवारी (दि.21) सायंकाळी गंजमाळ परिसरात घडली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील 25 संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या दगडफेकीत एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. गंजमाळ पोलिस चौकी परिसरात भीमवाडी आणि पंचशीलनगर या दोन वस्त्या असून, या ठिकाणी जुन्या वादाची कुरापत काढण्यात आली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यावसन सायंकाळी साडेसात वाजता दगडफेकीत झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, रात्री उशिरा पुन्हा हे गट एकमेकांसमोर आले. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार हे पथकांसह घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त कुमक मागवत गंजमाळच्या संपूर्ण परिसरात पहारा तैनात करण्यात आला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून 19 संशयितांची धरपकड केली. या घटनेने परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होती. सोमवारी (दि.22) दिवसभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता जाणवली.

हेही वाचा :

Back to top button