Nashik : भालूर परिसरात तरसाचा धुमाकूळ | पुढारी

Nashik : भालूर परिसरात तरसाचा धुमाकूळ

भालूर : (जि. नाशिक) उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणारे जंगली प्राणी आता ऐन पावसाळ्यातही मानवी वस्तीत शिरकाव करत असून पाळीव जनावरांना तसेच नागरिकांनाही त्यांनी लक्ष्य करून हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, तरस या जंगली प्राण्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास भालूर धरणाच्या परिसरात गायींना लक्ष्य केले. त्यानंतर भालूर गावात आदिवासी वस्तीत धुमाकूळ घातला. गल्लीत काही तरुणांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर उभ्या असलेल्या दुचाकींचे सीट कव्हर फाडले. वस्तीतील तरुणांनी एकत्र येत त्याला गावाबाहेर पळवून लावले. मात्र रात्रभर गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण होते. दरम्यान, वनविभागाने वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बिबट्या की तरस?

दरम्यान सुरुवातीला सोशल मीडियावर बिबट्या आल्याची माहिती पसरली आणि नेमका हा जंगली प्राणी बिबट्या की तरस याबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र जेव्हा त्याने गावातील आदिवासी वस्तीत शिरकाव केला तेव्हा नागरिकांनी सांगितले की बिबट्या नसून तो तरस आहे.

हेही वाचा :

Back to top button