मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण तुमचे कामही सोपे करते; जाणून घेऊया मिठाचे आणखी काही फायदे? | पुढारी

मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण तुमचे कामही सोपे करते; जाणून घेऊया मिठाचे आणखी काही फायदे?

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क: जिथे समान प्रमाणात मीठ अन्नाची चव बदलते, तिथे जास्त प्रमाणात चव खराबही होऊ शकते. योग्य प्रमाणात मीठ सेवन करणे कोणत्याही प्रकारे हानिकारक नसते, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही इतर अनेक गोष्टींसाठी देखील मीठ वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे फायदे?

1. सजावट स्वच्छता
घरात ठेवलेलया कृत्रिम फुलांना स्वच्छ करण्यासाठी फुले मिठाच्या पिशवीत ठेवा आणि पिशवी जोराने हलवा. फुले साफ होतील.

2. मृत त्वचा काढा
आंघोळीनंतर त्वचेला मीठ लावून एक्सफोलिएट करा. मीठ शरीराच्या गुडघे, कोपर सारख्या कोरड्या भागांची मृत त्वचा काढून टाकते. जर तुम्ही मीठ टाकून एक्सफोलिएट करत असाल तर त्वचेला कोणतीही जखम होणार नाही याची काळजी घ्या.

3. अंडी खराब तर नाही ना
अंडी खराब तर नाही ना हे तपासण्यासाठी एक ग्लास पाण्यात २ चमचे मीठ टाकून अंडी टाका जर अंडी पाण्यात वर आली तर ते खराब आणि ताजी अंडी खालीच राहतील.

4. डोळ्यांची काळजी
सकाळी उठल्यावर अनेक वेळा डोळे फुगलेले दिसतात. त्यामुळे हा फुगवटा कमी करण्यासाठी १ कप गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून त्यात कापड भिजवून डोळ्यांखाली ठेवल्याने सूज कमी होण्यास मदत होते.

5. दात स्वच्छ करणे
दातांना चमक आणण्यासाठी 1 चमचा मीठ आणि 2 चमचे सोडा एकत्र करून पेस्ट दातांवर लावा.

6. साफसफाई करण्याची आयडिया
तांब्याची भांडी मीठानेही स्वच्छ करता येतात. पांढरा व्हिनेगर गरम करा. त्यात 3 चमचे मीठ घालून तांब्याच्या भांड्यावर शिंपडा मग स्वच्छ करा.

7. कीटक टाळणे
मधमाशी चावल्यास ती जागा ओलसर करून त्यावर मिठाची पेस्ट लावावी.

8. फ्रीज साफ करणे
फ्रीजमधील डागांमुळे कधीकधी दुर्गंधी येते. त्यामुळे यासाठी तुम्ही मीठ वापरू शकता. सोडा, पाणी आणि मीठ मिसळून द्रावण तयार करा आणि फवारणी करून घासून घ्या. मीठ डाग आणि वास दोन्ही दूर करेल.

 

 

Back to top button