Shivsena : महिला अत्याचाराविरूद्ध शिवसेना आवाज उठवणार; खासदार अरविंद सावंत | पुढारी

Shivsena : महिला अत्याचाराविरूद्ध शिवसेना आवाज उठवणार; खासदार अरविंद सावंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात सध्या लज्जास्पद घटना घडत आहेत. सध्याचे बेशिस्त सरकार पाहता त्यांना लवकर न्याय मिळणे अवघडच आहे. गेल्या आठवड्यात भंडाऱ्यात घडलेल्या अत्याचार प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार मनिषा काईंदे, नगरसेविका संजना घाडी यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिली असता, त्यावेळी तेथील पाहिलेली परिस्थिती ही वेदनादायी होती. त्यामुळेच राज्यातील महिला अत्याचाराविरूद्ध शिवसेना आवाज उठवणार असल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, पक्षाच्या वतीने पीडितेला आम्ही सांत्वन, आर्थिक मदतीसाठी त्यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात भंडाऱ्यातील घडलेली अत्यचाराची घटना ही ह्दयद्रावक आहे. मिळालेल्या माहितीपेक्षा भेट दिल्यानंतर समोर आलेली परिस्थिती ही मिळालेल्या माहितीपेक्षा खूपच वेदनादायी होती, असे स्पष्ट करत राज्यातील महिला अत्याचाराविरूद्ध शिवसेना आवाज उठवणार असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

 

Back to top button