नाशिक : जुने सीबीएस येथे वृद्धेच्या बॅगेतून तीन तोळे सोने केले लंपास | पुढारी

नाशिक : जुने सीबीएस येथे वृद्धेच्या बॅगेतून तीन तोळे सोने केले लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जुने सीबीएस येथे वृद्धेच्या बॅगेतून चोरट्याने तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. मंजुळाबाई लक्ष्मण पवार (६५, रा. निफाड) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

मंजुळाबाई यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि.१६) दुपारी तीनच्या सुमारास जुने सीबीएस येथे त्यांच्या बहिणीजवळ असलेल्या बॅगेतून चोरट्याने ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button