कृषी विभागाची भिस्त घरच्या बियाण्यांवरच; ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे तपासणीत नापास झाल्याचे स्पष्ट | पुढारी

कृषी विभागाची भिस्त घरच्या बियाण्यांवरच; ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे तपासणीत नापास झाल्याचे स्पष्ट

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य बियाणे महामंडळाचे सोयाबीन बियाणे तपासणीमध्ये नापास झाले असून एकूण बियाणे पुरवठ्यात महाबीजचा वाटा दहा टक्के आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. यंदाही कृषी विभागाच्या नियोजनातील सोयाबीन बियाण्याची भिस्त शेतकर्‍यांच्या घरच्या बियाण्यांवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके असून त्यांचे खरिपातील क्षेत्र मोठे आहे. राज्यात खरीप हंगामात जिल्हानिहाय बीबियाणे, खतांचे नियोजन करण्यात आले असून कोणत्याही निविष्ठांची कमतरता राहणार नसल्याचे भुसे यांनी कृषी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

रक्तात लोहाचे प्रमाण कमी असल्यास उपचार घ्या, महापालिका आयुक्त पाटील यांचे आवाहन

यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. रावसाहेब भागडे व कृषी संचालक उपस्थित होते. राज्यात 97 ते 103 टक्के पावसाचा वेधशाळेकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे. भौतिक बदलामुळे पाऊस उशिराने येताना दिसतो.

त्यामुळे जोपर्यंत मान्सूनचा पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या करू नयेत, असे आवाहन भुसे यांनी केले. ते म्हणाले, ’शेतकर्‍यांच्या घरच्या सोयाबीन बियाण्याचा वापर सध्या 55 ते 60 टक्के आहे. तो जाणीवपूर्वक प्रचार-प्रसिद्धीद्वारे 65 टक्क्यांच्या पुढे नेण्याचे नियोजन आहे.

वाण विकसित करा

‘कृषी क्षेत्राचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी पिकांचे वाण विकसित करावेत,’ अशी सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली. शेतकर्‍यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे ते म्हणाले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 107 वी बैठक गुरुवारी (दि.16) त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

ठेकेदाराचा कारखान्याला साडेसात लाखांचा गंडा

1 जुलैला कृषी दिन व कृषी सप्ताह साजरा करणार

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 1 जुलैला कृषी दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गावपातळीपर्यंत शेतकर्‍यांशी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच कृषी सप्ताह साजरा करण्यात येणार असून प्रत्येक दिवसाचे नियोजन करावे.

पीक विम्यासाठी ‘एमपी’च्या धर्तीवर निविदा

पीक विम्याच्या योजनेसाठी मध्य प्रदेश सरकारने 80:110 आणि 60:130 या फॉर्म्युल्याप्रमाणे निविदा काढली आहे. राज्याच्या बीड मॉडेलच्या प्रस्तावास केंद्राने अद्याप परवानगी दिली नाही. मात्र, मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने निविदा मागविल्या असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी काम करा

राज्यातील कृषी विद्यापीठांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले असून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यात विद्यापीठांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याच धर्तीवर राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकर्‍यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे,’ असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. शिवाजीनगर येथील शिरनामे सभागृहात गुरुवारी (दि.16) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीनआढावा बैठकीत ते बोलत होते

हेही वाचा

युवा कलाकार गाजवताहेत रंगभूमी; प्रायोगिक नाटकांतून हाताळले जाताहेत युवा पिढीच्या भावविश्वातील विषय

विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

पुनर्विवाहाची इच्छा पडली महागात; शिक्षिकेची आठ लाखांची फसवणूक

 

Back to top button