Jalgaon : रेल्वे स्थानकावर सफाई कामगार महिलेस सापडले 6 लाखांचे दागिने | पुढारी

Jalgaon : रेल्वे स्थानकावर सफाई कामगार महिलेस सापडले 6 लाखांचे दागिने

जळगाव: जिल्ह्‌यातील पाचोरा येथील रेल्वेस्थानक आवारात १३ तोळे वजनाचे ६ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. सफाई कामगार महिलेस दागिण्यांनी भरलेली पिशवी सापडली असून, याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा रेल्वे स्थानकावरील सफाई कामगार असलेल्या उषा गायकवाड या कचरा टाकण्यासाठी पीजे लोकोशेडच्या मागील बाजूस गेल्या. कचरा टाकून परतत असताना त्यांना तेथे हिरव्या रंगाची कॅरीबॅग दिसली. त्यांनी ती उचलून त्यांचे सुपरवायझर शरद पाटील यांना दाखवली असता, त्यात काही तरी वस्तू असल्याचे लक्षात आल्याने उषा गायकवाड, शरद पाटील यांनी लोहमार्ग दूरक्षेत्र पोलीस चौकीत हवालदार ईश्वर बोरुडे यांचेकडे कॅरीबॅग सोपवली. त्यात दागिने आढळून आले. सुमारे १३ ग्रॅम वजनाचे ६ लाख ६ हजार रुपये किमतीचे दागिने त्यात मिळून आले.

त्यात एक सोन्याचा हार, चार बांगड्या, कानातील एरिंग व साखळीचे टॉप्स, एक चैन, एक पेंडल अशा स्वरूपाचे दागिने आहेत. सदरचे दागिने रेल्वे पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून, चाळीसगाव रेल्वे पोलीस मुख्यालयात दागिने जमा करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button