बेळगाव : एपीएमसी व्यापार्‍यांकडून आंदोलन ;जय किसान मार्केटप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी | पुढारी

बेळगाव : एपीएमसी व्यापार्‍यांकडून आंदोलन ;जय किसान मार्केटप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यापार्‍यांची भेट घेऊन आमच्या समस्यांवर तोडगा काढावा, यामागणीसाठी शुक्रवारी एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांनी एपीएमसी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकारी पाटील यांनी 5 जून रोजी व्यापार्‍याना भेटण्यास बोलावले होते. मात्र निवडणूक कामात ते व्यस्त राहिल्यामुळे त्यांनी भेट होऊ शकली नाही, असे व्यापार्‍यांचे मत आहे. गांधीनगर येथील जय किसान होलसेल भाजी मार्केटला बेकायदा परवानगी देण्यात आली असून, त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, यामागणीसाठी अनेक दिवसापासून एपीएमसी मार्केटमधील व्यापार्‍यांचे आंदोलन सुरु आहे.

यापूर्वीचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्यापार्‍याना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र त्यांची अचानक बदली झाल्याने व्यापार्‍यांच्या समस्या कायम राहिल्या आहेत. नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची एपीएमसी व्यापार्‍यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी 5 जून रोजी पाटील यांनी बोलावले होते. मात्र ते शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कामात व्यस्त राहिल्याणमुळे व्यापार्‍याशी चर्चा होऊ शकली नाही. व्यापार्‍यांचा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन यावर जिल्हाधिकार्‍यांनी तोडगा काढावा या मागणीसाठी शुक्रवारी एपीएमसी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनामध्ये असिफ कलमनी, सतीश पाटील, विनोद राजगोळकर, बसनगौडा पाटील, मोहसीन धारवाड, सदानंद पाटील, संजीव सिद्रामनी आदी सहभागी झाले होते

व्यापार्‍यांचे प्रयत्न

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापार्‍यांनी प्रारंभापासून जयकिसान मार्केटला विरोध करण्यात आला आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, मंत्री यांची भेट घेऊन मार्केटची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button