नाशिक : धोकादायक वाड्यांचा वीज, पाणीपुरवठा खंडित होणार, मनपा आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक : धोकादायक वाड्यांचा वीज, पाणीपुरवठा खंडित होणार, मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धोकादायक वाडे, इमारती आणि घरमालकांना नोटीस देऊनही घरे खाली केली जात नसल्याने शहरातील 1,077 धोकादायक मिळकतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा पवित्रा मनपा आयुक्त रमेश पवार यांनी घेतला आहे. रहिवासी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार देत असल्यास संबंधित मालमत्तेच्या जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानंतरच कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांनी गेल्या महिन्यातच धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करण्यास संबंधित विभागांना बजावले आहे. यामध्ये धोकादायक वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सूचित करण्यात आले. यानंतर धोकादायक वाडे, इमारतींना नोटिसा देऊन रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत सूचना करण्यात आल्यानंतरही नागरिक धोकादायक ठिकाणी राहत असल्याचे आढळून आल्याने आयुक्त यांनी पुन्हा नोटीस देऊन सुरक्षितस्थळी जाण्याचे फर्मानच दिले आहेत. तसेच संबंधित मिळकतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button