नाशिक : विहीरीत पडला कोल्हा, वनकर्मचाऱ्यांनी ‘असे’ काढले बाहेर | पुढारी

नाशिक : विहीरीत पडला कोल्हा, वनकर्मचाऱ्यांनी 'असे' काढले बाहेर

नाशिक (जातेगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या शेतातील विहिरीमध्ये रविवारी (दि. १२) पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ आलेला कोल्हा पडला. या कोल्ह्याला अथक प्रयत्नांनंतर विहीरीच्या बाहेर काढण्यात यश आले आहे. 

याबाबत कासारी येथील वनपाल मगन राठोड आणि वनरक्षक राजेंद्र दोंड यांना शेतकरी गवळी यांनी माहिती दिली. त्यानुसार मनमाड येथील सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे व नांदगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक चंद्रकांत कासार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राठोड, वनरक्षक दोंड, वनमित्र विष्णू जाधव, दशरथ जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोंडेगाव येथील ग्रामस्थ आणि राजेंद्र गवळी, लहानू जाधव, समाधान जाधव, पंढरीनाथ मोरे, रमेश जाधव, युवराज सोनवणे व इतरांच्या मदतीने विहिरीत जाळी टाकून कसरतीने कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जवळच नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

वन्यजीवास सुखरूप जिवंत बाहेर काढल्याबद्दल शेतकरी गवळी आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तर वनविभागाच्या वतीने वनपाल राठोड यांनी कोल्ह्यास विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या नागरिकांना धन्यवाद दिले.

हेही वाचा :

Back to top button