नाशिक : नोटप्रेसतर्फे बुधवारपासून दुर्मीळ नोटांचे प्रदर्शन | पुढारी

नाशिक : नोटप्रेसतर्फे बुधवारपासून दुर्मीळ नोटांचे प्रदर्शन

नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा

भारतात ब्रिटिशांनी 1925 मध्ये नोटांचा कारखाना सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत छापण्यात आलेल्या जुन्या व नव्या नोटांचे प्रदर्शन जेलरोड येथील नोट प्रेससमोरील रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इमारतीत 8 जूनला भरणार आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. खासदार हेमंत गोडसे, नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष उद्घाटन करतील. नोटप्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, जयराम कोठुळे, संतोष कटाळे, राजाभाऊ जगताप, अविनाश देखरुकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. नोटप्रेस चालू झाल्यापासून आजपर्यंत छापलेल्या नोटांच्या या प्रदर्शनात आहेत. त्यात एक रुपयाच्या नोटेपासून एक हजार, पाच हजार, दहा हजारांपर्यंतच्या नोटा बघण्यास मिळतील. नाशिकरोडची नोटप्रेस 1962 मध्ये सुरू झाली. नोटप्रेसचा इतिहास, मशीनरी, नोटा छापण्याची प्रक्रिया याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button