मनसुख खूनप्रकरणी चौकशी केल्यास ठाकरे अडचणीत येतील : सोमय्या | पुढारी

मनसुख खूनप्रकरणी चौकशी केल्यास ठाकरे अडचणीत येतील : सोमय्या

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचारी आहे. त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारच. त्यांनी मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले, तरी मी घाबरणार नाही. कारण माझ्यामागे महाराष्ट्रातली जनता असल्याचे सांगत, मनसुख खूनप्रकरणी चौकशी केली, तर उद्धव ठाकरे अडचणीत येतील, असेही माजी खा. किरीट सोमय्या म्हणाले.

नाशिकरोड भाजप व्यापारी संघटनेचा मेळावा रविवारी (दि. 5) कदम लॉन्स येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, माजी आमदार बाळासाहेब सानप तसेच लक्ष्मण सावजी, अशोक सातभाई, सुनील आडके, शरद मोरे आदी उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले की, आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार हे खिलाडीओं के खिलाडी आहेत. भ्रष्टाचार कसा लपवायचा, हे त्यांच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे. पण काहीही झाले, तरी आता आम्ही आघाडी सरकारमधील घोटाळेबाजांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत. सचिन वाजे आता माफीचा साक्षीदार आहे. त्यांची नियुक्ती ही ठाकरे यांनीच केल्याने ते अडचणीत सापडतील, असे सांगून सोमय्या यांनी घोटाळेबाज सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. याप्रसंगी अण्णा आढाव, मंदा फड, गणेश सातभाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button