सातारा : घरफोडीतील तडीपाराला अटक | पुढारी

सातारा : घरफोडीतील तडीपाराला अटक

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  

घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या व तडीपार केलेल्या रवी निळकंठ घाडगे (वय 25, रा. सैदापूर ता. सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दोन वर्षांसाठी त्याला तडीपार केले असतानाही तो सातार्‍यात खुलेआम फिरत असताना डीबी पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक (डीबी) पथक मोळाचा ओढा परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना एकजण संशयास्पदरीत्या पळून जावू लागला. पोलिसांच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो रवी घाडगे हा घरफोड्या करणारा सराईत असल्याचे समोर आले. लॉकडाऊन कालावधीमध्ये त्याने साथीदारांसोबत घरफोड्या केल्या आहेत. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर मात्र त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. संशयिताकडे प्राथकमिक चौकशी केली असता तो कोणाच्याही परवानगीने सातार्‍यात आला नसल्याचे स्पष्ट झाले. तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत यादव, पोलिस हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने यांनी केली.

Back to top button