नाशिकमध्ये घंटागाडी कामगारांतर्फे पर्यावरण महोत्सवाचे आयोजन | पुढारी

नाशिकमध्ये घंटागाडी कामगारांतर्फे पर्यावरण महोत्सवाचे आयोजन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून योगदान देणाऱ्या घंटागाडी कामगारांच्या वतीने राज्यात पहिल्यांदाच नाशिकमध्ये रविवारी (दि. ५) पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रोटरी क्लब हाॅल, गंजमाळ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत होणार असून, यानिमित्ताने पर्यावरणाचा जागर करण्यात येणार आहे.

महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दुपारी 12 वाजता प्रसिध्द भारुडकार चंदाबाई तिवारी (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उद्घाटन प्रसिध्द नाटककार, लेखक व पर्यावरण स्नेही उद्योजक लोकेश शेवडे हे करतील. यावेळी स्वागताध्यक्ष पद्माकर इंगळे, निमंत्रक महादेव खुडे उपस्थित असतील. रोटरी क्लब नाशिक व नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ. आवेश पलोड उपस्थित राहणार असून, रोटरी क्लबच्या वतीने डाॅ. हर्षल आढाव, डाॅ. विनय कुलकर्णी, डाॅ. श्रीया कुलकर्णी, डॉ. अंजना महाजन, डॉ. अस्मिता ढोकरे, डॉ. शिल्पा दयानंद, डाॅ. नागेश मदनुरकर, डाॅ. चंद्रकांत संकलेचा, डाॅ. सारिका देवरे, डाॅ. महेश मंगळूरकर, डाॅ. रचना चिंधडे आदी तज्ज्ञ डाॅक्टर्स उपस्थित राहणार आहेत.

यानंतर दुपारी 3 ते 4.30 या वेळेत डाॅ. मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणस्नेही शहर, संकल्पना व आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, यात अॅग्रोवन चे पत्रकार मनोज कापर्डे, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव डावरे, ज्ञानेश उगले, यु.के.अहिरे, भिला ठाकरे, सचिन मालेगावकर, महादेव खुडे आदी सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचा समारोप नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव हे करतील. शहरात पहिल्यांदाच भरणा-या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक कमिटी- कैलास मोरे, शरद आहिरे, रफिक सैय्यद, लोटन मराठे, विठ्ठल शिंदे, नाना सुर्यवंशी, बाळू वाघमारे, कचेश्र्वर विधाते, नितीन सोनकांबळे, रवि पगारे, सुभाष गवारे, बाजीराव सोनवणे, विश्वास साळवे, नितीन शिराळ, सुरेश गायकवाड, पूनमचंद शिंदे, मारुती सोळवे, विद्याधर उबाळे, विजय गांगुर्डे, अंशीराम साठे, सर्जेराव राखपसरे, तात्याराव थोरात, सचिन आल्हाट, दिनेश वाघ आदींनी केले आहे.

पर्यावरणप्रेमींचा होणार सत्कार..
या कार्यक्रमात शहरातील व जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येईल. यात वृक्षमित्र शेखर गायकवाड, किचन गार्डन प्रकल्प राबविणारे संदीप चव्हाण, हिरवे पुण्य नर्सरीच्या कुसूमताई दहिवेलकर, बायोगॅस प्रकल्पाचे संतोष शिंदे, नागली प्रक्रिया उद्योग पुष्पा भोये, महुआ सर्फेस क्लिनरच्या यमुना दळवी, अनुसया पवार, हरिता बीज बॅकेच्या छबी महाले, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच चे निशिकांत पगारे, पक्षीमित्र अतुल माळी यांचा सत्कार करण्यात येईल.

हेही वाचा :

Back to top button