थ्री-डी प्रिंटेड कान! | पुढारी

थ्री-डी प्रिंटेड कान!

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि थ—ी-डी प्रिंटिंगचा आहे. आता अमेरिकन डॉक्टरांनी थ—ी-डी प्रिंटिंगच्या सहाय्याने एक मोठे यश मिळवले आहे. त्यांनी एका वीस वर्षीय तरुणीच्या पेशींचा वापर करून थ—ी-डी प्रिंटेड कान बनवला आणि त्याचे यशस्वी प्रत्यारोपणही केले. जगातील हे ‘बायोप्रिंटेड लिव्हिंग टिश्यू इम्प्लँट’चे पहिलेच उदाहरण आहे! हा थ—ी-डी प्रिंटेड कान तरुणीच्या दुसर्‍या कानाशी आकार व अन्य बाबतीत मिळता-जुळताच आहे. तो तिच्या नैसर्गिक कानासारखाच दिसतो. मूळची मेक्सिकोची असलेल्या अ‍ॅलेक्सा या तरुणीला उपजतच मायक्रोटिया हा विकार होता.

या जन्मजात दोषामुळे कानाचा बाह्य हिस्सा छोटा किंवा अविकसित राहतो. एखाद्याच्या श्रवणक्षमतेवरही त्याचा परिणाम होत असतो. अमेरिकेत दरवर्षी सुमारे 1500 मुलं अशा दोषासह जन्मतात. अमेरिकेतील ‘थ—ी-डी बायो थेरॅप्युटिक्स’ या औषध कंपनीने यावर हा उपाय शोधला. टेक्सासमध्ये मायक्रोटिया-कॉन्जेनिटल इअर डिफॉर्मिटी इन्स्टिट्यूटच्या साथीने अ‍ॅलेक्सावर कान प्रत्यारोपणाची तयारी सुरू केली. त्यानंतर सॅन अँटोनियोमध्ये कान पुनर्निर्माण सर्जन डॉ. आर्टुरो बोनिला यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी ऑरीनोवो इम्प्लँटचा वापर करून कानाची निर्मिती केली. त्यांनी मायक्रोटिया कानाच्या अवशेषांमधून अर्धा ग्रॅम भाग हटवून तरुणीच्या या नव्या कानाचे प्रत्यारोपण केले.

Back to top button