धुळे : पिंपळनेरला चोरट्यांनी फोडले मोबाइल दुकान; ६९ हजारांचे साहित्य लंपास | पुढारी

धुळे : पिंपळनेरला चोरट्यांनी फोडले मोबाइल दुकान; ६९ हजारांचे साहित्य लंपास

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील मेनरोडवरील श्री सेवा मोबाइलचे दुकान फोडून चोरट्यांनी रोकडसह ६९ हजारांचे साहित्य लंपास केले. दुकानमालक महेश मदन भावसार (४५, रा. भावसार गल्ली, मेनरोड, पिंपळनेर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजावरील खिडकीचे गज तोडून आतून हाताने दरवाजाची कडी उघडत घरात प्रवेश केला. दुकानातून रोकडसह मोबाइलचे ब्ल्यूटूथ, चार्जर असे ६९ हजारांचे साहित्य चोरून नेले. पिंपळनेर पोलिसांत चोरट्यांविराेधात गुन्हा दाखल झाला असून, पाेलिस उपनिरीक्षक अमृतकर अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button