संगमनेरातील नवे बदल कुणाच्या पथ्यावर..?

संगमनेरातील नवे बदल कुणाच्या पथ्यावर..?
Published on
Updated on

संगमनेर:

आगामी होणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील 9 गटांमध्ये 1 नव्या गटाची भर पडली आहे. त्यामुळे आता संगमनेर तालुक्यात एकूण10 गट झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी मागील वेळी 18 गण होते, मात्र आता या 18 गणांमध्ये नव्याने 2 पं. स. गणांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता एकूण 20 पंचायत समितीचे गण झाले आहेत. त्यात मागील वेळी असणार्‍या काही गणांची नावे बदलून त्याच भागातील दुसरे गण अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे अनेक गटांची आणि गणांची तोडफोड झाल्यामुळे काही विद्यमान सदस्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे.

जिल्हा परिषद गटांची तसेच पंचायत समिती गणाची रचना जाहीर करण्यात आलेली आहे. मागील वेळी संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पान, समनापूर, संगमनेर खुर्द, धांदरफळ , बोटा, साकुर ,आश्वी, घुलेवाडी आणि जोर्वे जिल्हा परिषदेचे गट होते, मात्र यावेळीच्या झालेल्या गट रचने मध्ये चंदनापुरी हा नव्याने गट तयार झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील 10 गटातून 10 जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार आहेत.

पंचायत समितीचे निमोण, समनापुर, तळेगाव ,वडगाव पान घुलेवाडी, गुंजाळवाडी,राजापूर धांदरफळ बुद्रुक ,संगमनेर खुर्द,सावरगाव तळ, आश्वी बुद्रुक,आश्वी खुर्द,जोर्वे, अंभोरे साकुर ,पिंप ळगाव देपा, बोटा आणि आंबी खालसा हे पंचायत समितीचे 18 गण होते, मात्र यातील पिंपळगाव देपा आंबी खालसा, सावरगाव तळ हे पंचायत समितीचे गण बदलून त्याच ठिकाणी आता नव्याने चंदनापूरी, पेमगिरी, वरवंडी आणि खंदरमाळवाडी हे गण अस्तित्वात आले आहेत. त्यामध्ये नव्याने कोकणगाव व पेमगिरी या गणाची नव्याने भर पडलेली आहे. त्यामुळे आता संगमनेर मधून 20पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत.

संगमनेर तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या चंदनापुरी गटामध्ये आणि कोकणगाव व पेमगिरी गणांमध्ये नवीन उमेद वाराची भर पडणार आहे. तसेच अनेक विद्यमान सदस्यांच्या गटांमध्ये आणि गणांमध्ये दुसर्‍या गटातील व गणातील गावे आल्यामुळे त्यांना आता निवडणूक लढविताना खूप तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे मात्र तितकेच खरे.

मागील निवडणुकीच्या वेळी संगमनेर खुर्द हा गट नव्याने तयार झाला होता. या गटामध्ये पश्चिमेकडील गावांचा समावेश करण्यात आला होता, परंतु आत्ताच्या गट रचनेमध्ये संगमनेर खुर्द गटाचे विभाजन होऊन चंदनापुरी गट नव्याने निर्माण झाला आहे. संगमनेर खुर्द गटामध्ये असणारी बहुतेक गावे नव्याने तयार झालेल्या चंद नापूरी गटाला जोडली गेली.

त्यामुळे संगमनेर खुर्द गटातून वेगळा व नव्याने तयार झालेल्या चंदनापुरी गटातून वेगळा उमेदवार प्रतिनिधित्व करणार आहे, परंतु या दोन्ही गटांमधील गावांमध्ये काहीअंशी बदल झाला आहे. तसेच चंदनापुरी गटां मध्ये पठार भागातील कडेची काही गावे या गटात आल्यामुळे चंदनापुरी गटातून प्रतिनिधित्व करणार्‍यांची अंशी दमछाक होणार आहे.

संगमनेर खुर्द गटामध्ये बहुतेक गावे नव्या गट रचनेमध्ये चंदनापुरी गटात गेली. तळेगाव गटासह जोर्वे गटातील अनेक गावे संगमनेर खुर्द गटामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे संगमनेर खुर्द गटातमधून उमेदवारी करणार्‍यांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news