धुळे : निजामपूरच्या तरुणाला ऐंशी हजाराचा गंडा | पुढारी

धुळे : निजामपूरच्या तरुणाला ऐंशी हजाराचा गंडा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा :
साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे येथे तरुणाला नियुक्तीचा मॅसेज पाठवून त्यासोबत दिलेल्या लिंकच्या आधारे ८० हजार रूपयांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. तसेच ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विकास सुदाम खलाणे (२१,निजामपूर जैताणे) तरुणाच्या तक्रारीनुसार दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी त्याच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. त्यानुसार ५०० रूपये प्रतीदिन या पगारावर त्याची नियुक्ती करण्यात आल्याचा संदेश आला. तसेच त्याचे अभिनंदनही करण्यात आले. सोबत त्यांनी एक व्हॉट्सअप लिंकही दिली होती. सदरची लिंक गुगल क्रोमवर खलाणे यांनी ओपन केली असता त्यावर काही माहिती भरण्यास सांगितली. त्यानुसार खलाणे यांनी माहिती भरली असता त्यांच्या निजामपूर येथील बँकेच्या खात्यातून ३ हजार रूपयांची कपात झाली. त्यानंतर १५ डिसेंबर पावेतो अनुक्रमे एक हजार, तीन हजार, पाच हजार, पाच हजार, दहा हजार, तीन हजार, वीस हजार, वीस हजार असे तब्बल ८० हजार रूपये परस्पर काढून घेण्यात आले. परस्पर पैसे जात असल्याचे लक्षात आल्यावर हाती काहीच लागत नसल्याने अखेर विकास खलाणे याने निजामपूर पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा धुळे सायबर क्राईमकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतिष गोराडे करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button