‘झाडू’ने कोणाची होणार राजकीय साफसफाई | पुढारी

‘झाडू’ने कोणाची होणार राजकीय साफसफाई

नेवासा : पुढारी वृत्तसेवा

नेवाशात आम आदमी पार्टीच्या झाडूतून नेमकी कोणाची राजकीय साफसफाई होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ऐन निवडणूक काळात विरोधी पक्ष सलाईनवर असताना आम आदमी पार्टीकडून राजकीय भवितव्यासाठी कसरत करीत आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी स्वपक्षातील कार्यकर्त्यांचा मोठा जथा निर्माण करून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे शिवसेनेत ‘इनकमिंग’ सुरू केले आहे.

Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी जगते ग्लॅमरस लाईफ, पाहा तिचे हाॅट फोटो

सत्ताधारी शिवसेनेने तालुक्याच्या राजकारणावर हुकमत गाजविण्यासाठी सर्व सत्तास्थाने शिवसेनेच्या ताब्यात असून, विरोधी पक्षाची अवस्था कुबड्यावर असताना ऐन निवडणुकांच्या धामधुमीत आम आदमी पक्षाने शहरासह तालुक्यात पक्ष वाढविण्यासाठी पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते राजू आघाव व पूर्वाश्रमीचे दलित चळवळीतील युवकनेते अ‍ॅड सादिक शिलेदार यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून पक्षाचा तालुक्यात विस्तार वाढविण्याची प्रभावीपणे मोहीम अवलंबविली आहे.

कर्नाटक जांभळे पथ्यावर; स्वस्त असल्याने पल्प उद्योगासाठी उद्योजकांकडून खरेदी

पक्षाने आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी रणशिंग फुंकले असून, आम आदमी पक्षाच्या झाडूतून नेमकी कशी राजकीय स्वच्छता होणार, याकडे राजकिय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

आलवणे यांच्या प्रवेशाने समीकरणे बदलली

भाजपचे माजी शहराध्यक्ष संदीप आलवणे यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली असून, देवराम सरोदे, बाळासाहेब साळवे, प्रवीण तिरोडकर, अण्णा लोंढे हे पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते तालुक्यात पक्षवाढीसाठी संघटना बळकट करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.

Back to top button