नाशिक : रेल्वेमार्ग भूसंपादनास दोडी बुद्रुकमध्ये प्रतिसाद | पुढारी

नाशिक : रेल्वेमार्ग भूसंपादनास दोडी बुद्रुकमध्ये प्रतिसाद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे सेमीस्पीड रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी नाशिक जिल्ह्यात आवश्यक असलेल्या जमिनींच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या आवाहनाला दोडी बुद्रुक येथील शेतकर्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिले असून, या रेल्वेमार्गासाठी दोडी बुद्रुक येथील दहा खरेदीखत नोंदविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

आतापर्यंत दहा खरेदीखतांद्वारे 6.92 आर हेक्टर जमिनींची खरेदीही झाली त्यापोटी 11,11,71,917 रुपये रक्कम देण्यात आली आहे. इतरही शेतकर्‍यांनी पुढे येऊन शासनास सहकार्य करण्याचे आवाहन महारेलचे सचिन कुलकर्णी यांनी केले आहे. सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील निवृत्ती आनंदा आव्हाड, शिवाजी कारभारी आव्हाड, नवनाथ शिवाजी आव्हाड, विठ्ठल शिवाजी आव्हाड, दगडाबाई एकनाथ पालवे, एकनाथ बाबूराव पालवे, सुदाम चिमाजी आव्हाड, मधुकर चिमाजी आव्हाड, राजाराम देवराम आव्हाड, महादू पुंजा आव्हाड या शेतकर्‍यांची खरेदीखतांची नोंदणी झाली. त्यापोटी शेतकर्‍यांना आठ दिवसांत मोबदला देण्यात येणार आहे. गत दोन महिन्यांपासून नाशिक-पुणे द्रुतगती रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील 20 पेक्षा अधिक गावे ही सिन्नरमधील असून, नाशिकमधील अवघ्या पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने सिन्नरमधील गावांतील जमीन संपादनासाठी मूल्यांकन दर जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत 15 गावांचे दर जाहीर झाले आहेत. पण जमीन विक्रीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने थेट भूसंपादन कायद्याने सक्तीने जमीन संपादनासाठीही दुसर्‍या बाजूने नियोजन सुरू केल आहे.

दोडी बुद्रुक गावांतील शेतकर्‍यांनी पुढे येत खरेदी दिल्याबद्दल समाधान. तसेच इतर शेतकर्‍यांनी ही पुढाकार घ्यावा अन्यथा सहा महिन्यांनंतर सक्तीने भूसंपादन करण्यात येईल. यातून कमी मोबदला शेतकर्‍यांना मिळू शकेल. त्यामुळे आताच संधी असल्याने शेतकर्‍यांनी त्वरित जमिनींची खरेदी द्यावी. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी.

हेही वाचा:

Back to top button