नाशिक मनपा निवडणूक आरक्षण सोडत : पहा कुठल्या प्रभागात किती जागा महिलांसाठी राखीव | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक आरक्षण सोडत : पहा कुठल्या प्रभागात किती जागा महिलांसाठी राखीव

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज (दि. 31) महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती 10 जागा, अनुसूचित जमाती 5 जागा, तर सर्वसाधारण महिलांसाठी 12 याप्रमाणे अशा एकुण 27 महिलांचे आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रारंभी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी महिला आरक्षण सोडत संदर्भात रुपरेषा सांगितली. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडत अशी…

अनुसूचित जाती महिला- महिलांसाठी राखीव पहिली चिठ्ठी आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 12 अ निघाली या पाठोपाठ १४अ, २६अ, ४१अ, ४३अ, ३५अ, ३४अ, ४४अ, २२अ व २७ अ अशा एकुण 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

अनुसूचित जमाती – प्रभाग क्र 7 ब, 11 ब, 2 अ, 4 अ, 34 ब अशा एकुण 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

सर्वसाधारण महिला- प्रभाग क्र 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 29 ब, 30 ब, 31 ब, 32 ब, 33 ब, 36 ब व 37 ब अशा एकुण 12 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

दरम्यान, आरक्षण सोडतीसाठी होणारी गर्दी पाहता महापालिकेने फेसबुक लाइव्हद्वारेदेखील सोडतीचा कार्यक्रम नागरिक तसेच इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केला होता.

हेही वाचा :

Back to top button