नाशिकमध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग, छऱ्याच्या बंदुकीचा धाक दाखवून दिली जीवे मारण्याची धमकी | पुढारी

नाशिकमध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग, छऱ्याच्या बंदुकीचा धाक दाखवून दिली जीवे मारण्याची धमकी

नाशिक : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अंबड परिसरात उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अरविंद गुलाब चक्रनारायण (रा. सार्थक अपार्टमेंट, वेणूनगर, खुटवडनगर) याने पीडितेच्या घरी वारंवार जबरदस्तीने घुसून शरिरसुखाची मागणी केली. तसेच या प्रकारची वाच्यता केल्यास छऱ्याच्या बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button