नाशिक : सर्पदंशाने महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ | पुढारी

नाशिक : सर्पदंशाने महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

नाशिक : सर्पदंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बेलतगव्हाण येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना वसंत बेंडकुळे (३०) यांना राहत्या घरी उजव्या हाताच्या बोटाजवळ सर्पदंश झाला होता. त्यांना दिर केशव बेंडकुळे यांनी बिटको रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपाचारादरम्यान यमुना बेंडकुळे यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button