पुणे : सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर एफडीएचा छापा | पुढारी

पुणे : सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर एफडीएचा छापा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वाकड येथील सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला, असून यात विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून ७ लाख ७३ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला साठा

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नसून स्वाभिमान! संभाजीराजेंचा मोठा निर्णय

विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करुन त्यांची विक्री करणाऱ्या मे. ग्रूमिंग एन्टरप्राइसेस प्रा. लि. (दत्तमंदीर जवळ, वाकड) या ठिकाणी औषध निरीक्षक, महेश कवटीकवार, अतिश सरकाळे, रझीया शेख व सहायक आयुक्त, के. जी. गादेवार यांनी छापा टाकला. कंपनीने विनापरवाना बनावट शाम्पू, कंडिशनर, बिअर्ड वॉश, हेअर ट्रीटमेंट व विविध केरेटीनयुक्त सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करून विक्री केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. औषध निरीक्षकांनी ७ लाख ७३ हजार रुपयांची सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या उत्पादन करण्याकरीता लागणारा कच्चा माल, पॅकींग मटेरीयल, बॉटल्स, लेबल्स इ. साहित्य जप्त केले आहे.

श्रीनगर : सौरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील, सौंदर्य प्रसाधने नियम २०२० प्रमाणे सौंदर्य प्रसाधने उत्पादनासाठी नमुना Cos 8 मध्ये परवाना घेणे अनिवार्य आहे. विनापरवाना उत्पादन करणे कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना उत्पादन करु नये असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून, सौंदर्य प्रसाधन उत्पादन परवान्याच्या माहितीसाठी संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन, गुरुवार पेठ, पुणे येथील कार्यालयात संपर्क साधावा. सौंदर्य प्रसाधने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी सुध्दा लेबलवर उत्पादन परवाना नमुद असल्याची खात्री करावी व बिलांव्दारे त्याची खरेदी करावी, असेही अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा

Cruise drug bust case | कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचिट

Dilip Walse- Patil : राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची भरती : दिलीप वळसे- पाटील

corona : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ३ टक्क्यांनी वाढ

Back to top button