नाशिक : पुणतांब्याच्या हाकेला मुंजवाडच्या ग्रामसभेची साथ | पुढारी

नाशिक : पुणतांब्याच्या हाकेला मुंजवाडच्या ग्रामसभेची साथ

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
पुणतांबा (ता. राहाता) येथील शेतकर्‍यांनी संपाची हाक दिल्यानंतर मुंजवाड (ता. बागलाण) येथे बुधवारी (दि.25) झालेल्या विशेष ग्रामसभेत शेतकर्‍यांशी संबंधित 16 मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावाची प्रत तहसीलदारांना सादर करून एक जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी 2017 प्रमाणे पुन्हा एकदा शेतकरी संपाची हाक दिली आहे. त्यावेळी तो संप ऐतिहासिक झाला होता. याच पुणतांबा गावातून आता 5 वर्षांनंतर शेतकर्‍यांनी एक जूनपासून धरणे आंदोलन करण्याचा ठराव ग्रामसभेत केल्यानेे त्याच धर्तीवर मुंजवाड येथील ग्रामसभेत शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे ठराव मंजूर केले आहेत. पुढील सात दिवसांत याची दखल न घेतल्यास, एक ते पाच जून या कालावधीत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरपंच प्रमिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला केशव सूर्यवंशी, मिलिंदकुमार जाधव, वैभव अहिरे, श्रीपाद जाधव, नरेंद्र जाधव, धनराज जाधव, नानाजी जाधव, विठोबा पवार, वैभव वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button