नाशिक : क्राइम ब्रांच अधिकारी असल्याची बतावणी करुन एकाला लुटले | पुढारी

नाशिक : क्राइम ब्रांच अधिकारी असल्याची बतावणी करुन एकाला लुटले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पांढुर्ली शिवारात क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगत एकाला लुटल्याची घटना घडली. लक्ष्मण आवडजी भोर (52, रा. विंचुरदळवी) हे दुचाकीवरून नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी पांढुर्ली येथील लक्ष्मण महाराज आश्रमाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्याने जात होते. यावेळी सफेद रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट, चॉकलेटी रंगाचे शूज घातलेला मध्यम वयाचा एक इसम विनानंबरच्या पल्सर दुचाकीवरून आला. त्यांनी भोर यांना थांबवत आम्ही क्राइम ब्रँचमधून आल्याची बतावणी करून तपासणी करायची असल्याचे सांगितले.

यावेळी त्याने भोर यांच्या खिशातील 20 हजारांची रोकड व 2 तोळ्यांची सोन्याची चेन काढून घेत रुमालात बांधून परत केली व निघून गेला. भोर यांनी रुमाल उघडला असता त्यात काहीही नसल्याचे दिसून आले. भामट्याने हातचलाखीने त्यांची रोकड व चेन घेऊन तेथून पोबारा केला. भोर यांना आपण लुटले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात धाव घेऊन भामट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button