नाशिक : घऱाजवळच्या दुकानात एकाची आत्महत्या, परिसरात खळबळ | पुढारी

नाशिक : घऱाजवळच्या दुकानात एकाची आत्महत्या, परिसरात खळबळ

नाशिक : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना अंबड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सुकदेव माळी (अशोक कल्पतरू कॉलनी, चुंचाळे शिवार, अंबड) यांनी राहत्या घराजवळील वर्कशॉप दुकानात पत्र्याच्या शेडच्या अॅंगलला दोरीच्या सहायाने गळफास घेतला.

त्यांना उपाचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button