कसारा घाटात क्रूझर उलटली ; बालिका ठार | पुढारी

कसारा घाटात क्रूझर उलटली ; बालिका ठार

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात धबधबा पॉइंटच्या पुढे एका नागमोडी वळणावर बुधवारी (दि. 11) मुंबईच्या दिशेने जाणार्‍या क्रूझर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंतीला आदळली. या भीषण अपघातात एक बालिका जागीच ठार झाली, तर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दर्शना विजय कांबळे (11 ,रा. मंठा, जि. जालना ) असे मृत बालिकेचे नाव आहे. मालेगाव येथील लीलाबाई लिंबाजी राठोड (30), लिंबाजी राठोड (40), वसई येथील विठ्ठल चव्हाण (45), जयश्री गजानन पवार (34), अन्वी गजानन पवार (1), कल्पना राजेश जाधव (30), श्यामराव चव्हाण (60) हे सर्व जण किरकोळ जखमी झाले. जखमींना टोलनाका रुग्णवाहिकेने कसारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

क्रूझर (क्र. एमएच 22, यू 2801) उलटल्यानंतर काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, अपघातग्रस्त वाहन तातडीने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

हेही वाचा :

 

Back to top button